कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी- वैभववाडी दरम्यान २१ जूनला तीन तासांचा मेगा ब्लॉक
रत्नागिरी : रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस 21/06/2023 रोजी रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी रोखून ठेवली जाणार आहे.
दिनांक 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.
याचबरोबर दिनांक दिनांक 21 जून रोजी सुरू होणारा गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी रोखून ठेवण्यात येणार आहे.
मेगा ब्लॉकच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे कडून करण्यात आले आहे.