महाराष्ट्र
गणपतीपुळ्यात संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले गणरायाचे दर्शन!
रत्नागिरी : माघ वद्य चतुर्थीनिमित्त (संकष्ट चतुर्थी ) गणपतीपुळे येथील मंदिरात गुरुवारी हजारो भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात गुरुवारी असंख्य भागी दाखल झाले होते. यानिमित्त मंदिरात मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रींच्या गाभाऱ्यासमोर फुलांची आकर्षक आरास केली होती. कोकण तसेच महाराष्ट्रासह विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.