महाराष्ट्र

चिपळूणच्या नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी उरण तालुका नाभिक समाज आक्रमक

सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील नाभिक समाजाची कु.निलीमा सुधाकर चव्हाण या युवतीच्या संशयास्पद नृत्य प्रकरणी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अतिशय गरीब कुटुंबातील कन्या दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत नोकरीस होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी बँकेची सुट्टी झाले नंतर घरी येत असतांना ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जवळच्या खाडीत दि. १आँगष्ट २०२३ रोजी सापडला. निलिमा चव्हाण हिचा संशयास्पद मृत्युची पोलीस प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तातडीने सखोल चौकशी करून तपास लावावा, असे अमानुष व अमानवी कृत्य करणारे संशयीतांचा तपास होऊन संशयीताला कठोर शासन करावे अशी मागणी नाभिक समाजाची सर्वात प्रभावी व आक्रमक संघटना असलेल्या श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरणतर्फे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी नाभिक समाजाच्या भावना तातडीने वरीष्ठांपर्यंत पोहचवाव्यात असेही निवेदनात उल्लेख आहे.

यावेळी श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष -विजय जाधव,खजिनदार -शैलेश पंडित, सेक्रेटरी -रामचंद्र शिंदे,सदस्य -संदिप कृष्णा जाधव,प्रदिप पंढरीनाथ मुकादम,संजय दत्तात्रेय साळुंखे,शेखर नारायण शिंदे,रविंद्र श्रीकांत मुकादम,शरद सुधाकर घाडगे, संगिता दिलीप जाधव,दिपाली दिवाकर शिंदे,सारिका शैलेश पंडित.जेष्ठ सल्लागार-प्रमोद यशवंत मुकादम,मधुकर धनाजी चव्हाण यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

नीलिमाणचा मृत्यु संशयास्पद

चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील रहिवासी व दापोलीच्या २४ वर्षीय तरुणी निलिमा चव्हाण हिचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला. असून त्यामुळे तालुक्यासह चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, निलिमा हिचा मृत्यू हा आकस्मिक नसून घातपाताचा संशय कुटुंबियाबरोबरच ओमळी गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.दापोली स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी निलिमा सुधाकर चव्हाण, (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत सहा महिन्यापूर्वी कंत्राटी लिपिक पदावर रुजू झाली होती. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असल्याने ती आपल्या ओमळी गावी जात असे.

दि. २९ जुलैचा शनिवार हा महिन्याचा पाचवा शनिवार होता. मात्र, मोहरमची सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्रीच निलिमाने आपला भाऊ अक्षय याला फोन करून आपण गावी येणार असल्याचे कळविले. निलिमा सकाळी दापोली रहात असलेल्या रुमवरून गावाकडे जाण्यास निघाली. दरवेळेच्या वेळेत निलिमा घरी न पोहोचल्याने ओमळी येथे असलेल्या घरच्यांना घोर लागला व त्यांनी सर्वत्र फोन केले . निलिमाच्या मैत्रिणीने ती सकाळीच दापोलीतून निघून गेल्याचे सांगितले. पण या वेळी निलिमाचा फोन लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांची काळजी वाढली. अखेर हताश होऊन चिपळूण व दापोली पोलीस स्थानकात निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दापोली पोलीस ठाण्यात शनिवारी निलिमा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दापोली पोलिसांनी आपला तपास सुरू केला. मात्र दुसऱ्याच दिवशी रविवार असल्याने बँक बंद असल्याने तेथून माहिती, तसेच सीडीआर मिळणे कठीण बनले. दापोली एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती तरुणी खेडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्याचे दिसते.१आँगष्ट रोजी त्या मुलीचे पूर्ण केस काढून चेहरा विद्रुप केल्या गेले. छिन्ह विच्छिन्न अवस्थेत त्या मुलीचा मृतदेह तालुक्यातील दाभोळ खाडीकिनारी आढळून आला आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button