महाराष्ट्र

चिपळूणमधील हिंदू राष्ट्र जागृती सभेत जिहाद विरोधात लढा देण्याचा निर्धार

वक्फ कायदा रहित करण्याची मागणी संघटितपणे करा : मनोज खाड्ये,हिंदू जनजागृती समिती

चिपळूण : आज भारतीय सैन्याकडे सर्वाधिक १८ लाख एकर भारतीय,रेल्वे कडे १२ लाख एकर, तर तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाकडे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात उटंबरगाव व परिसरातील जमिनीं वक्फ बोर्डाने आपला अधिकार असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या जिल्ह्यात भविष्यात अनेक जमीनींवर वक्फ बोर्डाकडून हक्क प्रस्थापित केला जाऊ शकतो. आज आपण अनभिज्ञ आहोत. वक्फ कायद्याच्या नावाने भारतीयांची संपत्ती हडप केली जात आहे.यासाठीच हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा अशी संघटितपणे मागणी करा,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यसमन्वयक श्री. मनोज खाड्ये यांनी केले.

दि. २६ डिसेंबर रोजी येथे झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निलेश सांगोलकर उपस्थित होते.
यावेळी श्री. मनोज खाड्ये यांनी पुढे बोलताना सांगितले की, हिंदू जनजागृती समितीची स्थापना चिपळूण येथील श्री विरेश्वर मंदिरात झाली आणि श्रीकालभैरवाचे आशीर्वाद घेऊन हिंदू राष्ट्राची ही चळवळ देश विदेशात पोहोचली.त्याच चिपळूणच्या परशुराम भूमीत हिंदू राष्ट्राचा पहिला झेंडा रोवला जाईल असा निर्धार आज करूया. तसेच आतंकवाद्यांना पोसणाऱ्या हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही असा निश्चयही आज करा असे आवाहन त्यांनी केले.


या सभेला ५ हजार पेक्षा अधिक संख्येने हिंदूंचा जनसागर उपस्थिती होता. सभेला संबोधित करताना सनातनच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी हिंदू राष्ट्राची चळवळ जर आपल्याला पुढे न्यायची असेल तर त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान आवश्यक आहे. अन्यथा हिंदू राष्ट्राचे कार्य मानसिक बौद्धिक किंवा भावनिक पातळीलाच राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना संघटित करून बलाढ्य शत्रूंना नमवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शारीरिक स्तरावर सर्व आयूधांचे प्रशिक्षण घेतलेहोतेच परंतु त्यांच्या मुखात नेहमी जगदंब जगदंब असे नाम असे. त्यांना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे गुरु म्हणून लाभले. हिंदू राष्ट्रासाठी संख्याबळ नाही तर आध्यात्मिक शक्ती आवश्यक आहे त्यासाठी आपण साधना केली पाहिजे असे सांगितले.


अधिवक्ता निलेश सांगोलकर यांनी बोलताना सांगितले, की सरकारी कर्मचारी नव्हे तर भक्तच मंदिरांची सेवा प्रामाणिकपणे करू शकतात. यासाठी हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात येण्यासाठी समाजातून मागणी होणे आवश्यक आहे.अर्थात त्यासाठी आपल्याला सनदशीर मार्गाने लढा द्यावा लागेल.हिंदू विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून कार्याला मिळालेल्या यशाची काही उदाहरणे देऊन राष्ट्र आणि धर्म यांचे हानी करणाऱ्या घटनांच्या संदर्भात कार्याची पुढील दिशा यावेळी त्यांनी सांगितली.
हिंदू जनजागृती समितीच्या कार्याची ओळख सुरेश शिंदे यांनी दिली .तर सभेचे सूत्रसंचालन श्री महेश लाड आणि डॉक्टर सौ. साधना जरळी यांनी केले.
यासभेला श्री कालभैरव देवस्थानचे विश्वस्त समीर शेट्ये, श्री किशोर शेट्ये , विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री उदय चितळे, श्री परशुराम सागावकर , ह.भ.प. प्रकाश महाराज निवळकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष हभप भगवान कोकरे, ह.भ.प. शांताराम नवेले, सावर्डे येथील ह.भ.प. दत्ताराम मुंडेकर,हभप किरण घाग, लोटे येथील ह भ प नारायण पवार, धामणंद येथील प्रमोद सकपाळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेनेचे विधानसभाक्षेत्राध्यक्ष बाळा कदम, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे दिलीप चव्हाण, निहार कोवळे, भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर,मनसेचे तालुकाध्यक्ष अभिनव भुरण, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री उदय चितळे, साईनाथ कापडेकर,पराग ओक, लोटीस्माचे श्री प्रकाश देशपांडे,राजे प्रतिष्ठान गोवळकोटचे अध्यक्ष विशाल राऊत,उद्योजक शैलेश टाकळे, गोरक्षक संदीपराव कदम चिपळूण व्यापारी संघटनेचे वासुदेव भांबुरे, खेर्डीचे उपसरपंच विनोद भुरण यांच्यासह सनातनचे संत, वारकरीसांप्रदायासह विविध सांप्रदाय व हिंदुत्वादी संघटनाचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button