चिरणीत १९ जानेवारीपर्यंत हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह
देवरूख : हनुमान सेवा प्रासादिक भजन मंडळ मौजे चिरणी ता.खेड यांचे वतिने हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याची घटस्थापना ह. भ. प. दत्ताराम आंब्रे व हभप शांताराम आंब्रे याचे हस्ते करण्यात आली. हा सोहळा १९ जानेवारीपर्यंत चालणार असून दररोज पहाटे ४ते ६ काकडा आरती. ८ते १२ ज्ञानेश्वरी पारायण. १ ते ३ महाप्रसाद. ४ते ६ प्रवचन ६ ते ७ हरिपाठ. रात्रौ ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन व हरिजागर सपंन्न होणार आहे. दि १८ जानेवारी रोजी प्रसिध्द शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
चिरणी गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणेसाठी प्रवचन. पारायण. व किर्तन या सह शिव चरित्र व्याख्यान श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.