‘जाणता राजा प्रतिष्ठान’तर्फे १७ जानेवारीला रक्तदान शिबीर
हुतात्मा दिनाचे औचित्य साधून पागोटे येथे आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जानेवारी 1984 मधील गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्मे नामदेव शंकर घरत (चिर्ले ), हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम ), हुतात्मा महादेव हिरा पाटील (पागोटे ), हुतात्मा केशव महादेव पाटील (पागोटे ), हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल (पागोटे )यांचा 39 वा स्मृतीदिन मंगळवार दि 17 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा पागोटे येथे मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरे करण्यात येणार आहे.
जाणता राजा प्रतिष्ठान पागोटे व श्री साई ब्लड सेंटर पनवेल यांच्या माध्यमातून तसेच डॉ. प्रेम पाटील यांच्या विशेष सहकार्याने मंगळवार 17/1/2023 रोजी अर्थातच हुतात्मा स्मृतीदिनी जिल्हा परिषद शाळा पागोटे येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी, इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले आहे.