जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे स्नेहसंमेलन संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) :आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई ठाकूर स्कूल, आवरे ता उरण, जि. रायगड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने उरण खालापूर विधानसभेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की ग्रामीण भागात कमी फी मध्ये शिक्षण देवून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शाळा करत आहे. कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेवून सोळा महिन्याच्या फी माफ केल्याबद्दल शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले. गावातील पाण्याची टाकी ते शाळेपर्यंतचा रस्ता शासनाची निधी वापरून अथवा स्वखर्चाने सिमेंट क्रॉकीटचा तयार करण्याचे आश्वासन भोईर यांनी दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटीका, फैन्सी ड्रेस व गाणी सादर केली. क्रिडा क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांना मेडल तसेच विद्यालयातून तीन एस. एस. सी बँचेस च्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आर्दश शिक्षक कौशिक ठाकूर, आर्दश शिक्षक महेश गावंड, सरपंच निराबाई पाटील, इंडियन आयडॉल सागर म्हात्रे, लावण्य सम्राटनी माया शिंदे , गाव अध्ययक्ष संजय गावंड, संस्थेचे खजिनदार वामन ठाकूर, सचिव अलका ठाकूर, विश्वस्त सिंधू ठाकूर व प्रसार ठाकूर,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, गाव उपाध्यक्ष अशोक पाटील, नृत्यनिर्देशक सचीन पाटील, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा विशाखा गावंड, रा. जि. प. शाळेचे चेअरमन राजेश गावंड व अमित म्हात्रे, ग्रामस्थ,पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कायक्रमाचे सुत्र संचालन संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कांचन थळी यांनी केले