जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री उदय सामंत
प्रजासत्ताक दिनी दिमाखदार संचलन
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे, अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळयात दिली.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद आहे असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. राज्यात रत्नागिरी वासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल असे सांगून सोहळयात आलेल्या नागरिकांचे अभिनंदन करीत आभार आपल्या भाषणात मांनले.
भटक्या जाती व जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून त्यांनी दादा इदाते यांचे अभिनंदन केले.
या दिमाखदार सोहळयात पोलिस दलांसह, होमगार्ड, एन.सी.सी., ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथ यांचे संचलन यावेळी झाले.
पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल यावेळी मंत्री महोदयांच्या भिकुजी इदाते यांचा सत्कार आंरभी करण्यात आला. त्यानंतर विविध गुणवंताचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गुणवंताचा गौरव
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ. ५ वी) परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी (ग्रामीण विभाग) – अथर्व सतिश जराडे- पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, अजिंक्य हरी मेटकरी – जि.प. शाळा कोकरे, नं.४, ता. चिपळूण, लोकेश विलास सौंदळकर-जि.प. शाळा ओणी नं. ३, ता. राजापूर, मयुरेश कारभारी वाडेकर- जि.प. शाळा उमरे नं.१, ता. संगमेश्वर, अर्णव राजकुमार मगदुम- पी.जी. कांबळे ज्ञानदीप विद्यामंदीर भडगाव, ता. खेड.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ. ५ वी) परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी (शहरी विभाग)
मधुरा संजय पाटील – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी, आदित्य महेश दामले – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी, अर्शती समीर कारेकर- रत्नागिरी नगर परिषद शाळा न.15, दामले विद्यालय, रत्नागिरी, दुर्वा भालचंद्र बोडस- जि.प. शाळा लांजा नं.५, ता. लांजा
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी CBSC/ICSE)-
तन्मय उमाकांत भंडारी- श्री. विठ्ठलराव जोशी चॉरीटिस ट्रस्ट इंग्शिल मिडीयम सेंकडरी स्कूल, ता. चिपळूण, अभिजीत तानाजी तुरळ – पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूल, ता. संगमेश्वर
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी (ग्रामीण विभाग)
राधिका अमित रांगडे – पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, सुयश मोहन सोनावणे – पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, वेदिका गुणोजी माने- पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, आर्या संतोष भोईर – ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूल मोरवंडे, बोरज, ता. खेड, पार्थ सुनिल मन्वल- ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूल मोरवंडे, बोरज, ता. खेड, अन्वय प्रमोद कांबळे- पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, सायली राजेंद्र भालेराव – पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, यश संतोष साबळे- पी.जी. कांबळे ज्ञानदिप विद्यामंदीर, भडगाव, खेड, पंशुल काशिराम बावदाने- ज्ञानदिप इंग्लिश मिडियम स्कूल मोरवंडे- बोरज, ता. खेड
महाराष्ट्र पोलिस क्रिडा स्पर्धामधील महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू सत्कार
महाराष्ट्र पोलिस क्रिडा स्पर्धेमध्ये महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू मंजिरी रेवाळे यांचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रिडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्ते केलेले
खेळाडूंचा सत्कार
रायफल शुटींग मध्ये सुवर्ण पदक मिळविणाऱ्या पुष्कराज इंगवले, स्क्वॅश (मिश्र दुहेरी) मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या क्रीश संदीप कलकुटकी, स्क्वॅश (मिश्र दुहेरी) मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या सेजल सुनिल कदम, मॉडर्न पेटॅथलॉन मध्ये रौप्य पदक मिळविणाऱ्या आर्यन प्रशांत घडशी, मॉडर्न पेटॅथलॉन मध्ये कास्य पदक मिळविणाऱ्या निपुण सचिन लांजेकर आणि मॉर्डन पेटॅथलॉन मध्ये कास्य पदक मिळविणाऱ्या करण महेश मिलके यांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच 18 वी राष्ट्रीय –गाईड जांबोरी राज्यस्थानमध्ये सहभागी झालेल्या रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी, सरस्वती विद्यामंदीर, पाचल आणि कै. एकनाथ राणे इंग्लिश मि. स्कूल, लांजा यांचा सत्कारही करण्यात आला.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी व श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट बी के वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांचाही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.