महाराष्ट्र

जेएनपीएने तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे : एल. बी. पाटील

उरण (विठ्ठल ममताबादे) : कॉ. भूषण पाटील,सुधाकर पाटील,vसंतोष पवार, दिनेश घरत,राजेंद्र मढवी,प्रमोद ठाकूर,जितेंद्र ठाकूर,शेखर पाटील, अरविंद,चेतन गायकवाड,जागरकर्ते रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील आदी मान्यवरांनी सेझ भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी 2023 रोजी मल्टीपर्पज हॉल, टाऊनशिप, उरण येथे दुपारी 3 वाजता बेरोजगार युवकांचा मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यासाठी प्रकल्पबाधित (सेझ )बेलपाडा, करळ, सावरखार,सोनारी,जसखार या गावाच्या सेझ कमीट्या व सर्व सरपंच आणि सर्वपक्षीय नेते मंडळीनी बेरोजगार युवकांना मार्गदर्शन केले.

जेएनपीए बंदरावर -आधारित एसईझेडमधील नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेण्यासाठी जेएनपीएने सेझमधील उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी जेएनपीए कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सेझ जागर मेळाव्यात जागरकर्ते ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील यांनी केली. महत्वाच्या पदावर भूमिपूत्र रुजू होतील, अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा आग्रह त्यांनी यावेळी धरला. जेएनपीएकडून बंदरावर आधारीत सेझ प्रकल्प उभारला जात आहे. एकूण 700 एकर भूखंडावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. यातील 300 एकर जमिनीवर प्रकल्पासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, तर 400 एकरावर विविध प्रकारच्या उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. याची सुरुवात झाली आहे. या उद्योगावर,कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण भूमिपूत्र व स्थानिकांना द्या. अशी मागणी एल बी पाटील यांनी आपल्या भाषणातून केली.जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, कामगार नेते महादेव घरत, सीमा घरत, संतोष पवार आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनीही स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळाले पाहिजे हे सांगत असतानाच जेव्हा एखादी कंपनी बाहेरून उरणमध्ये येते तेंव्हा जमिनीचा भाव ठरविला जातो. मातीचा भाव ठरविला जातो. मात्र जो स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे त्याचविषयी, त्याच्या भविष्याविषयी कोणताच विचार केला जात नाही. हे उरण तालुक्याचे दुर्दैव असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले.

2025 पर्यंत उरण सेझ मध्ये दहा हजार पेक्षा अधिक नोकर भर्ती होणार आहे. मात्र ही भरती पैसे भरून नाही झाली पाहिजे किंवा दलाली करून नोकरी नाही लागली पाहिजे.कोणत्याही बेरोजगार युवकाला एकही रुपये न भरता आपल्या कर्तृत्वावर, गुणवत्तेवर युवकांनी नोकरी मिळवली पाहिजे त्यासाठी ज्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विविध प्रकल्पांना दिले, कंपन्याना दिले त्यांचा उरण परिसरातील विविध प्रकल्पातील, कंपनीतील नोकरीवर पहिला हक्क आहे मात्र दुर्दैवाने स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणाला उरणमध्ये नोकरी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकावर व त्या कुटूंबावर बेकारिची कु-हाड कोसळते. रोजगार नसल्याने त्या बेरोजगार युवकाला व त्यांच्या कुटुंबियांना विविध समस्याला सामोरे जावे लागते.पैसे भरून नोकर भरती होऊ नये, स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी मल्टीपर्पज हॉल, टाऊनशिप, उरण येथे युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सेझ संबंधित बेरोजगार युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जागरकर्ते रायगडभूषण प्रा.एल.बी पाटील , कॉ.भूषण पाटील,गोपाळ पाटील,संतोष पवार, दिनेश पाटील ,सुधाकर पाटील,महादेव घरत,जेएनपीटी सेझ प्लॅनर श्री. फडके, प्रशिक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील, निलेश तांडेल, सरपंच लखपती पाटील, जगजीवन भोईर,सीमा घरत,संगीता भगत,सरपंच अपर्णा पाटील,भैरवी पाटील,श्वेता राजकुमार, मच्छिंद्र घरत, संदेश ठाकूर, यशवंत ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button