महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण

डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर आबिटगाव येथे संपन्न

सावर्डे : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न, डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार निवासी शिबिर अबिटगाव येथे सोमवार दि . २३ डिसेंबर २०२४ ते रविवार दि. २९डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न झाले.

दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी आबिटगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता उद्घाटनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. या उद्धाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अबिटगावचे गावचे सरपंच सुहास भागडे व कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निखिलजी चोरगे उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे समता, न्याय, बंधुता, क्षमा आणि अहिंसा हे पाच गट पाडण्यात आले व पुढील नियोजन सुरू झाले. दि २४ डिसेंबर २०२४ रोजी बौद्धिक सत्रात तुकाराम पाटील सरांनी बाहुली नाट्यातून आनंददायी शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

बाहुली नाट्यातून व्यसन, वनव्यामुळे होणारे प्राण्यांची हानी तसेच आजच्या पिढीला लागलेले मोबाईलचे व्यसन इत्यादी विषयांवर प्रबोधन केले. नारायण पाटील या सत्राचे अध्यक्ष होते. हे सत्र मराठी शाळेत संपन्न झाले. दि २५ डिसेंबर २०२४ रोजी बौद्धिक सत्रात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते प्रा. मिलिंद कडवईकर सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थी या विषयावर प्रबोधन केले लोक अंधश्रद्धेला कसे बळी पडतात हे सरांनी आपल्या प्रात्यिक्षिकातून दाखवले या सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजलीताई चोरगे मॅडम उपस्थित होत्या.

दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी बौद्धिक सत्रात श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलास डिके सर यांनी भारतीय संविधान आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अबिटगावचे सरपंच सुवास भागडे तसेच ग्रामपंचायत सदस्य संदेश पवार व श्रीपत पवार उपस्थित होते. दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी बौद्धीक सत्राची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाने झाली.

या बौद्धिक सत्रात कामथे जिल्हा उपकेंद्र रुग्नालयाच्या जयश्री सुतार मॅडम यांनी एचआयव्ही एड्स आणि युवकांची भूमिका या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्ष अंजलीताई चोरगे या होत्या. दि. २८डिसेंबर २०२४ रोजी बौद्धिक सत्रात जलनायक युयुत्सु आर्ते सर प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी कोकणातील निसर्ग संपन्नतेवर आधारित व्यावसायिक संधी या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला अध्यक्ष अबिटगावचे सरपंच सुहास भागडे होते. दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी शिबीराचा समारोप कार्यक्रम आबिटगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चिपळून पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश खापले हे होते. या कार्यक्रमाला आबिटगावचे सरपंच सुहास भागडे, उपसरपंच दिपक भागडे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य संदेश पवार, माजी उपसरपंच बाळाराम भागडे, वीर गावच्या सरपंच श्रेया विरकर, मुर्तवडे गावच्या सरपंच श्रावणी भुवड, खांडोत्री गावच्या सरपंच सोनम सुवरे, खाडोत्री गावचे सरपंच दिनेश पुनवत, महाविद्यालयाच्या प्रार्चाया अंजलीताई चोरगे व कविष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन तांबेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या शिबीरात गावातील शाळा, धार्मिक स्थळे, पाणवठे यांची स्वच्छता, गाव सर्वेक्षण, जनजागृत्ती रॅली, पथनाट्य, विविध विषयांवर चर्चासत्रे, पारंपरिक खेळातून मनोरंजन, बंधारे बांधणे व सांस्कृतिक हे उपक्रम राबविण्यात आहे. या शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राचार्या अंजलीताई चोरगे, प्रा. संदिप येलये, प्रा. सनिया मुल्लाजी, प्रा. नंदा कांबळे, प्रा. श्वेता सकपाळ, प्रा. सोनल सुर्वे, प्रा. धनश्री सुर्वे, प्रा. अशोक लाड, प्रा. नितीन मेथे, प्रा. प्रशांत कडव व राजेंद्र सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button