महाराष्ट्र
दापोली दौऱ्यात राज्यपालांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
दापोली : राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी दापोली येथे दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री. एम देवेंदर सिंह यांनी त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने राज्यपाल रमेश बैस राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दापोली येथे त्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.