Adsense
महाराष्ट्र

दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव

उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री. छञपती शिवाजी महाराजांचे  कार्य, विचार, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिवकार्य करणाऱ्या दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग तर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून रविवार दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील डाउरनगर येथील द्रोणागिरी किल्ल्यावर पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

शिवजयंतीचे औचित्य साधून 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत द्रोणागिरी गडाची साफसफाई आणि सजावट, दुपारी 2 ते 5 उरण शहरातील विमला तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून रक्तदान शिबीर, सायंकाळी 4 वा. गडावरील कुंडातील पाणी घेउन खाली उतरणे, सायंकाळी 7 वा.उरण शहरातील विमला तलावातील महाराजांच्या मूर्तीला अभ्यंग स्नान, विमला तलाव येथे सांय. 8 ते 9.30 मशाल फेरी आणि दीपोत्सव तर 19 फेब्रुवारी 2023 रोजी विमलातलाव येथे सकाळी 7 वा. बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलविणे, सकाळी 8 वा. शिवप्रतिमा पूजन, 9 वा. विमल तलाव ते द्रोणागिरी किल्ला प्रतिमा मिरवणूक, द्रोणागिरी गडावर शिवराज्याभिषेक, दुर्ग पूजन पोवाडा , आणि मान्यवरांचे स्वागत तसेच शिवभोजन, सायंकाळी 4 वा. गडावरून खाली उतरणे, सा. 5 वा निरोप समारंभ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरणच्या विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, सहयाद्री प्रतिष्ठान उरण विभाग, शिवभक्त प्रतिष्ठान उरण विभाग, शिवभक्ती मित्र मंडळ उरण चारफाटा , युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर, योगा विथ पूनम ग्रुप, यान्सी ग्रुप ऑफ लिव्हिस टिम, सीआयएसएफ स्टाफ उरण, डाउरनगर ग्रामस्थ, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आदी विविध सामाजिक संस्था, संघटनाचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी,शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे उरण विभाग कमिटीने तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश कावले यांनी केले आहे.

In article

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button