महाराष्ट्र
पडवे येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन
सावंतवाडी : सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने दिवंगत आशिष परब क्रीडा मित्रमंडळ पडवे यांच्या वतीने उद्या दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर पडवे येथील सरपंच सुभाष दळवी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणार आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.