पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी दि. २७ : पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री
मंगलप्रभात लोढा, हे दि २८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
दौरा कार्यक्रमानुसार रविवारी सकाळी 8.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.45 वाजता विमानतळावरून जिल्हा नगरवाचनालयच्या दिशेने चारचाकी वाहनाने प्रयाण.सकाळी 9 वाजता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सदिच्छा भेट. सकाळी 9.20 वाजता भाजपा कार्यालय, रत्नागिरी येथे लोकसभा कोअर समिती सदस्य बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालय, रत्नागिरी येथे शहर बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता स्वा. सावरकर जयंती निमित्त आयोजित पद यात्रेत सहभाग.सकाळी 11 वाजता पतित पावन मंदिरात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता पतित पावन मंदिर येथे स्नेहभोजन. (राखीव). दुपारी 12 वाजता पतित पावन मंदिर येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण व जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठक. दुपारी 12.40 वाजता महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी 1.20 वाजता पर्यटन विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती व राखीव . नियोजित कार्यक्रम आटोपून दुपारी 4.वाजता रत्नागिरी विमानतळावरून विमानाने मुंबईला प्रयाण.