पागोटे ग्रामपंचायत व ग्रामविकास मंडळ पागोटेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जानेवारी 1984 मधील गौरवशाली व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्मे नामदेव शंकर घरत (चिर्ले ), हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम ), हुतात्मा महादेव हिरा पाटील (पागोटे ), हुतात्मा केशव महादेव पाटील (पागोटे ), हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल (पागोटे )यांचा 39 वा स्मृतीदिन मंगळवार दि 17 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत पागोटे व ग्रामविकास मंडळ पागोटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा, पागोटे येथे मोठ्या उत्साहात विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरे करण्यात आला.
यावेळी पागोटे ग्रामपंचायत व ग्रामविकास मंडळ पागोटे तर्फे हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे, विचारांचे समरण करुण अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत पागोटे व ग्रामविकास मंडळ पागोटे यांच्या संयुक्त विद्यमाने 1984 च्या पाच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हा परिषद शाळा, पागोटे येथे 39 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला . दि 17 रोजी सकाळी 10 वाजता हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.11 वा. हुतात्म्याच्या स्मारकास व प्रतिमांना हार अर्पण करण्यात आले , दु.12 वा.नवघर फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.दु.12:30 वाजता कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.असे विविध सांस्कृतिक, सामाजिक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन हुतात्मा दिनी करण्यात आले.
पागोटे गावात जिल्हा परिषद शाळेच्या अंगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उद्योजक जे एम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत,जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, लोकनेते दि. बा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,महिला सामाजिक कार्यकर्त्या भारती पवार,सीमा घरत यांच्यासह पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल, सदस्य-सतीश पाटील, अधिराज पाटील, मयूर पाटील, सदस्या- समृद्धी तांडेल, करिश्मा पाटील, सुनीता पाटील, प्राजक्ता पाटील, सोनाली भोईर, ग्रामसेविका -समीक्षा ठाकूर, ग्रामविकास मंडळचे अध्यक्ष आशिष तांडेल,माजी सरपंच भार्गव पाटील, माजी प्रभारी सरपंच सुमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील,सुप्रसिद्ध निवेदक अतिश पाटील,महेंद्र पाटील, महेश पाटील,ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग,सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.