पुनाडे येथे शिवजयंती साजरी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पुनाडे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील व मित्र परिवाराने विविध उपक्रमांचे आयोजन करून शिवजयंती साजरी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.धीरज डाकी, ना. क. पाटील गुरुजी, रोहिदास पाटील, रा. ल. पाटील गुरुजी, ना. श. पाटील गुरुजी, ब्रम्हदेव पाटील, महादेव पाटील,अड. ऋषाली पाटील, प्रीती पाटील, जनाबाई पाटील, श्वेता डा की, देवेंद्र काशिनाथ पाटील, रवींद्र पाटील, यश पाटील, स्वाती पाटील, सुवर्णा तांडेल, काशीबाई खारपटील, युट्युब सिंगर विराज डाकी,पदमाकर पाटील,हिराचंद ठाकुर, प्रणय पाटील ,मोहित घरत,जयेश पाटील, अमित पाटील आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.