पैसा फंड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल ९८ टक्के
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा दहावी २०२३ परीक्षेचा निकाल ९८.८६ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी ८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अभिनंदन केले आहे.
मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये तन्वी प्रशांत पाध्ये ९० : २८ टक्के प्रथम क्रमांक, भूमी हर्षानंद चव्हाण ८८ : ६० द्वितीय क्रमांक, अश्विनी अजय शिंदे ८८ टक्के तृतीय क्रमांक, श्रावणी रामचंद्र घोडके ८६ : ६० टक्के चतुर्थ क्रमांक, निधी विक्रांत पाटील ८५ : ६० टक्के पाचवा क्रमांक यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक प्राप्त केले आहेत. पैसा फंड इंग्लिश स्कूलने दहावी निकालाची आपली यशस्वी परंपरा कायम राखल्याने पालकवर्गाने देखील विद्यार्थी आणि प्रशालेचे अभिनंदन केले आहे.