महाराष्ट्र
बंगला घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्या १ जानेवारीला ठाकरे, वाईकरांविरोधात तक्रार दाखल करणार
मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील कोरलाई येथे बंगला घोटाळा झाल्याचा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आपण रेवदंडा पोलीस ठाण्यात ठाकरे तसेच वायकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडी मधील तत्कालीन मंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट विरुद्ध प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडलेल्या किरीट समय यांनी अलिबाग मधील कोरला येथील कथित बंगलो घोटाळा प्रकरणी आपण नव्या वर्षात पहिल्याच दिवशी ठाकरे तसेच वायकर यांच्या विरोधात अलिबाग मधील रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे बुधवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.