महाराष्ट्र

बारसूमध्ये घातपात घडवण्याचा विरोधकांचा कुटील डाव : नीलेश राणे

जिलेटिन स्फोटकांच्या साठ्यावरून राणी आणि व्यक्त केलेल्या संशयाने खळबळ

सिंधुनगरी : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याचे जाहीर झाले आहे. प्रकल्पाचे समर्थन करणारी ताकद मोठी आहे तर विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडू नये व निरपराध लोकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी येत आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांना बारसू येथे रिफायनरी प्रकल्प हवा होता तसे त्यानी त्यावेळी हा प्रकल्प का हवा देशाच्या पंतप्रधानांना लेखी पत्राने विनंती केले होती. आता तेच उद्धव ठाकरे प्रकल्प नको आहे म्हणून बारसू येते येत आहेत. तेथील लोक बदलली की उद्धव ठाकरे बदलले हे जनतेसमोर आले आहे. या प्रकल्पाला लोकांच्या विरोधाची तीव्रता कमी असली तरी त्यांना भडकवणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. यासाठी बाहेरून लोक आणण्याचा व काहीतरी अनुचित प्रकार घडविण्याचा बाहेरच्या लोकांचा कट आहे. या कटात उद्धव ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. परंतु लोक जमवून आंदोलन करण्याचा, विरोध करून लोकांना भडकवण्याचा त्यांचा हेतू योग्य नाही. त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधी आंदोलन केले तर आम्ही बारसू प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करून समर्थांनार्थ ताकद काय आहे हेही दाखवून देऊ असेही निलेश राणे म्हणाले.
राजन साळवी यांच्या चॅलेंज बद्दल बोलताना तें म्हणाले जैतापूर अनु ऊर्जा प्रकल्पाच्या भिकेवर मोठे झालेले हे नेतृत्व असून हिम्मत असेल तर त्यानी बारसू गावात जाऊन दाखवावे मगच त्यांनी राणे ना रोखावे असे प्रती चॅलेंज दिले आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे हे या भागाशी संबंध नसलेले लोक आहेत. येथील नागरिकांना भडकवण्याचे त्यांनी काम केले आहे. हा प्रकल्प विरोधामुळे गेला तर राज्यातील चौथा प्रकल्प जाणार आहे हे फार मोठे नुकसान असून तो प्रकल्प बारसू येथे व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे समर्थन आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही समर्थनाच्या बाजूने नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे असेही शेवटी निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button