बिबट्या सुटला आता फासकी लावणारा अडकणार!
लांजात आगवे येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याने केली स्वतःची सुटका ; फासकी लावणाऱ्याचा शोध सुरु
लांजा : लांजा तालुक्यातील आगवे येथे काजूच्या बागेत फासकीत अडकलेल्या बिबट्याने मोठया जिकिरीने स्वतः ची सुटका करून घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. लांजा वन विभाग पथकाच्या समोरच बिबट्याने सुटका करून घेतली. मात्र फासकी लावणाऱ्याचा शोध वन विभाग घेत आहे.
आज लांजा आगवे येथील पोलीस पाटील श्री. विजय जोशी यांनी लांजा वन खात्याला काजू बागेत एका फासकीत बिबटया अडकल्याची माहिती दिली. काजू बाग राखणदार श्री. जोशी यांनी पोलीस पाटील यांना अज्ञात व्यक्तीने डुकरासाठी फासकी लावल्याचे सांगून त्यात बिबट्या अडकला असल्याचे सांगितले.
लांजा वनक्षेत्र अधिकारी दिलीप आरेकर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सकाळी 9 वाजेपर्यंत बिबट्या फासकितून सुटण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचे प्रयत्न अखेर यशस्वी झाले होते सध्या काजू आंबा हंगाम सुरू असल्याने रानटी डुक्कर जनावरे काजू बोन्डे खाण्यासाठी काजू बागेत येत असतात. शिकार करण्यासाठी फासकी लावून शिकार सहजतेने करण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलीस वन विभागाने कडक कारवाई मोहीम हाती घेतली होती. तंटामुक्ती पोलीस पाटील यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु, फासकीचे प्रमाण अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बिबट्याच्या संख्येत वाढ झाली आहे. ही दिलासा दायक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षात ३७ बिबट्यांचा मृत्यू
फासकीत अन्य कारणाने बिबट्या मृत्यू गंभीर आहेत. भक्ष्यांचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडण्याचे प्रमाणही चिंताजनक असून, गेल्या सहा महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत दक्षिण रत्नागिरीत बिबटे वारंवार सापडू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या ७ वर्षांत विविध कारणांनी ३७ बिबटे मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी वन विभागाकडूनच मिळाली आहे.
बेसुमार जंगलतोडीने बिबट्यांचा अधिवास आणि भक्ष्य नष्ट होत असल्याने ते मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. भक्ष्यांचा पाठलाग करताना बिबटे विहिरीत पडण्याचे प्रमाणही चिंताजनक असून, गेल्या सहा महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत दक्षिण रत्नागिरीत बिबटे वारंवार सापडू लागले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. लागवडीच्या नावाखाली डोंगर ओसाड होत आहेत. यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊन भक्ष्यही संपुष्टात येऊ लागले आहे. रात्री शिकारीचे प्रमाणही वाढले असून, छुप्या रीतीने शिकार करण्यासाठी फासकी तंत्राचा अवलंब केला जात आहे. तंटामुक्त समित्यांच्या माध्यमातून या फासकी तंत्रावर अंकुश आणण्यासाठी जिल्हा पोलिसांनी प्रयत्न केले; मात्र त्याला यश येत नसल्याचेच चित्र आहे. जिल्ह्यात उत्तरेच्या तुलनेत दक्षिण रत्नागिरीत बिबट्यांची संख्या कमालीची वाढते आहे. त्याचबरोबर बिबटे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे.
२०१० पासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात विविध कारणांनी ३७ बिबट्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात २३ ठिकाणी बिबटे फासकीत अडकले. त्यात गुरफटून ८ बिबट्यांचा मृत्यू झाला तर जखमी झालेल्या १५ बिबट्यांवर औषधोपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले. आतापर्यंत १७ ठिकाणी बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या. त्यात यावर्षीचे प्रमाण अधिक आहे. ४ बिबट्यांना जीव गमवावा लागला, तर १३ बिबटे सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत फासकी लावणे आहे गुन्हा
जिल्हाभरात गेल्या ७ वर्षात नैसर्गिकरीत्या १६ बिबट्यांचा मृत्यू झाला, तर रस्ता, रेल्वे अपघातात ७ बिबट्यांना जीव गमवावा लागला. आतापर्यंत शिकारीत ३ बिबटे मारले गेल्याचीही नोंद आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर भार रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या, तसेच वन खात्यासमोरील समस्या, खवले मांजरासारख्या प्राण्यांची शिकार व तस्करी, जंगलतोड, चोरटे लाकूड अशा अनेक बाबी वनखात्याला हाताळाव्या लागतात. त्यासाठी २६ वनरक्षक, १० वनपाल आणि ३ वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. बिबटे वाचविण्यासाठी अथवा मृत झाल्यास त्याची छाननी करण्यासाठी याच कर्मचाऱ्यांतील पथकाला धावून जावे लागते फासकी लावणे हा वन्यजीव कायद्या अंतर्गत गुन्हा असून बिबटया, जंगली प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे