महाडच्या नाते खिंडीजवळ एसटी-बस डंपरचा भीषण अपघात ; २३ प्रवासी जखमी
महाड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर डंपर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. महाडजवळ एसटी बस आणि एका डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून जखमींना प्राथमिक उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.
हा अपघात मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास झाला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नाते खिंडीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई महाबळेश्वर बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई दिशेकडून महाडकडे येत असताना आणि डंपर महाड दिशेकडून जात असताना दोघांची समोरासमोर भीषण धडक झाली.
या अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून डंपर चालक देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.