महाराष्ट्र
महाराष्ट्रातील वीज दरवाढीविरोधात रत्नागिरीत आम आदमी पक्ष सरसावला!
दिल्ली, पंजाब सरकारचा आदर्श घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा समितीतर्फे महाराष्ट्रातील वीज दरवाढीविरोधात सोमवार, दि. २७ मार्च, २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्य सरकारने दिल्ली व पंजाब सरकारचा आदर्श घेऊन जनतेला वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, महामंडळाचे CAG ऑडीट करून भ्रष्टाचाराला आळा घालावा अशा मागण्या पक्षाचे जिल्हा अंतरिम संयोजक परेश साळवी यांनी केल्या आहेत.
यावेळी पक्षाचे रत्नागिरी जिल्हा संयोजक परेश साळवी, संगमेश्वर तालुका संयोजक सचिन आपिष्टे, राजापूर तालुका संयोजक हबीब सोलकर, नाटे संयोजक अझीम मिरकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.