महाराष्ट्रशिक्षण
माखजन हायस्कूलचा निमिष मिलिंद मोने वक्तृत्व स्पर्धेत दुसरा
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी निमिष मिलिंद मोने याने अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२३ अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
भरड धान्य उत्कृष्ट अन्न की आहार भ्रम या विषयावर त्याने आपले विचार मांडले. कु. निमिष मोने यास श्री गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदजी साठे,उपाध्यक्ष मनोज शिंदे,व अन्य संस्था संचालक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आदींनी अभिनंदन केले.