मेरी मिट्टी मेरा देश’, मिट्टी को नमन वीरो को वंदन’ अंतर्गत वेळासमध्ये शिलाफलकाचे अनावरण
‘
रत्नागिरी, दि.१२ : मंडणगड तालुक्यातील वेळास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत संपूर्ण मंडणगड तालुक्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश “मिट्टी को नमन वीरो को वंदन” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत वेळास येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई गटविकास अधिकारी विशाल जाधव, सरपंच सुनील पाटील, ग्रामसेविका श्रीमती दरीपकर तालुकास्तरीय सर्व खाते प्रमुख,अधिकारी ,कर्मचारी, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ,विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत जि.प.शाळा वेळास येथे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते शिलाफलक अनावरण करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांची विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून भाषण देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जि. प.शाळेपासून मंदिरापर्यंत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यात आली.
गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी गावदेवी मंदिरात प्रत्यक्ष हातावर दिवे घेऊन पंचप्राण शपथ घेतली. श्री. पुजार यांनी अमृत रोपवाटिकेचीही यावेळी पाहणी करून देशी झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच गावांमधील स्वच्छ भारत मिशन व बचत गटांमध्ये घेण्यात आलेल्या विहित उपक्रमाची सखोल पाहणी करून मार्गदर्शन केले.