रत्नागिरीतील स्फोटानंतर स्लॅबखाली दबलेल्या दोघींचा मृत्यू
मृत महिला मायलेकी ; दोघा जखमींना कोल्हापूरला हलवले
रत्नागिरी : रत्नागिरी शहर बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या शक्तिशाली स्फोटाने हादरले. हा स्फोट घरातील गॅस सिलिंडरचा असल्याचे सांगितले जात असले तरी अधिक चौकशीसाठी मुंबईहून अँटी टेररिझम स्कॉड घटनास्थळी दाखल झाले आहे. सायंकाळी उशिराने मिळालेल्या या घटनेच्या अधिक माहितीनुसार शक्तिशाली स्फोटाच्या या घटनेनंतर घराच्या स्लॅबखाली अडकून पडलेल्या मायलेकींचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संथा आणि परिसर बुधवारी पहाटे शक्तिशाली स्फ़ोटाने हादरून गेला. या परिसरात राहणाऱ्या अशफक काझी यांच्या घरात बुधवारी पहाटे स्फोट झाला आणि घराला आग लागली. हा स्फोट शक्तिशाली होता, यात घराचा काही भाग कोसळला. घटनेनंतर स्लॅब कोसळला तर आगीने भीषण धारण केले.
या स्फोटाच्या घटनेनंतर घरातील दोन महिलांसह चार जाणं अडकले. याची माहिती मिळताच शहर पोलिसांसह रत्नागिरी नगर परिषदेचे अग्निशमन यंत्रणा, एम आय डी सी येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ बचाव कार्याला सुरुवात केली. यातील अशफाक काझी आणि त्यांचा मुलगा अम्मार काझी याला बाहेर काढून तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दोघंही गंभीर भाजले असून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या दुर्घटनेत स्लॅबखाली अडकून त्यामध्ये कनिज अशफाक काझी आणि त्यांची आई नुरून्नीसा हमीद अलजी यांचा मृत्यू झाला आहे. या दोघीही मायलेकी आहेत. आईन ऋणनिसा या आपली लेक खनिजला पाहण्यासाठी रत्नागिरीला आली होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हेही घटनास्थळी दखल झाले. तर पोलिसांसह फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाली होते.स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनीही मोलाची मदत केली.
दरम्यान हा स्पोर्ट घरातील घरगुती वापराच्या सिलेंडरचा असल्याचे सांगितले जात असले तरी या घटनेच्या अधिक चौकशीसाठी मुंबईहून खास अँटी टेररिझम स्कॉड दाखल झाले आहे. त्या संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हा हा स्फोट नेमका कशाने झाला, स्पष्ट होणार आहे