रत्नागिरीत खा. विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक
रत्नागिरी दि. 6 : रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.
खासदर विनायक राऊत म्हणाले, शासनाच्या योजनांची कामे वेळेत पूर्ण करा. पाणी पुरवठा संदर्भातील योजनांचे काम तात्काळ मार्गी लावा. गणेशोत्सव काळात लो व्होल्टेज चा सामना नागरिकांना करावा लागू नये तसेच रत्नागिरी जिल्हयातील माती परिक्षण करुन घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती
, ई-अभिलेख, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीचे संगणकीय सादरीकरण प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी केले. या बैठकीसाठी विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते.