महाराष्ट्र
रत्नागिरीत बेकायदा पर्ससीन मासेमारी नौका पकडल्या
पुढील कारवाईसाठी पकडलेल्या नौकांसह गस्ती पथक भगवती बंदराकडे रवाना
रत्नागिरी : येथील समुद्रात अवैधपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन मासेमारी नौका समुद्रात गस्त घालणाऱ्या पथकाने पकडल्या आहेत. पकडलेले या नौकांना भगवती बंदरात आणून त्यांच्यावर कारवाईचे पुढील सोपस्कार केले जाणार आहेत.
समुद्रात मासेमारी करण्यासाठी पर्ससीन नौकांना नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग तसेच बंदर विभाग कडून समुद्रात गस्ती नौकांद्वारे घालण्यात येत असते. या गस्ती मोहिमेदरम्यान पथकाला प्रतिबंधित क्षेत्रात समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करताना पर्ससीन मासेमारी नौका आढळून आल्या आहेत. या नौकांना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत भगवती बंदरात आणून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.