रत्नागिरीत ३५ खलाशांसह बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन नौकांवर जप्तीची कारवाई
रत्नागिरी : नजीकच्या आरेवारेच्या समुद्र किनार्यापासून दोन वावाच्या आतील क्षेत्रात बेकायदेशीरपणे घुसून पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणार्या गोव्यातील दोन नौकांवर येथील सागरी सुरक्षा दलाने मंगळवारी कारवाई केली. या दोन्ही नौका पकडून त्यांना मिरकरवाडा बंदरात आणून त्याना मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. सुमारे 35 खलाशांसह पकडलेल्या या नौकांवर मंगळवारी सायंकाळी कारवाई व मासळी जप्त करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी किनार्यावरून परराज्यातील नौका घुसखोरी करून मासेमारी करीत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील नौकाचालकांकडून सुरू होत्या. मंगळवारी सकाळी जिल्हा सागरी सुरक्षा पोलिस दलाचे पथक पीएसआय श्री. केदारी यांच्या नेतृत्वाखाली गस्त घालत होते. यावेळी परराज्यातील मिसीसीपी 1 व स्टार ऑफ विलीनकिनी-2 या दोनकरीत असताना आढळल्या. या पथकाने त्यांची चौकशी केल्यानंतर त्या गोवा येथील असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही नौकांवर जवळपास 35 खलाशी असल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष पाटेकर, पीएसआय मनोजकुमार सिंग, एसआय कैलास भांडे, एसआय पी.के. सारंग, पोलीस कॉन्स्टेबल मुख्यालय विनोद महाडिक, सुरज जाधव यांनी या सर्व खलाशांना ताब्यात घेत दोन्ही नौका भगवती बंदरात आणल्या.
पकडलेल्या दोन्ही नौकांवरील मासळीचा बंदरात लिलाव करण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आली.