महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा


देवरूख (सुरेश सप्रे) : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा यावर्षी ६५ वा वाढदिवस असल्याने हा दिवस महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


महाविद्यालयाच्या दैदिप्यमान कामगिरीचा व मागील पंचवीस वर्षातील यशस्वी वाटचालीचा आढावा प्राचार्य महेश भागवत यांनी व्यक्त करून २५वर्षातील प्रतीची माहिती दिली.

कोकणातील विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन मा. माने यांनी १९९८ साली हे महाविद्यालय उभे केले. या महाविद्यालयाचे आज वटवृक्षात रुपांतर होताना माने यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले असून ही बाब आमच्यासाठी गौरवाचीच आहे. असे मत प्राचार्य महेश भागवत यांनी स्पष्ट केले
.
संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने व अन्य सुहासिनिंनी रवींद्र माने यांचे हिंदू परंपरेनुसार त्यांचे मंत्रोच्चाराच्या गजरात औक्षण करून अभिष्टचिंतन केले.प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुखांनी मा. माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रानिकेतनच्या प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थ्यांकडून मा. माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, सचिव चंद्रकांत यादव, सहसचिव दिलीप जाधव, प्रद्युम्न माने, प्रा. नितीन भोपळे तसेच तालुक्यातील विविध राजकीय नेतेमंडळी हे आंबव गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या उभारणी पासून मागील चोवीस वर्षात या महाविद्यालयातून बाहेर पडलेले सुमारे पाच हजाराहून अधिक विद्यार्थी इंजिनीअर होवून विविध क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देत आहेत. या महाविद्यालयामुळे आपल्याला मान सन्मान मिळाला. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द दिली. तसेच आज या महाविद्यालयामुळे भोवतालची परिस्थिती बदलली असून इथला विद्यार्थी इंजिनिअर बनून समजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे भावपूर्ण उद्गगार माने यांनी व्यक्‍त केले. त्यांनी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी यांच्याकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.

या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालयामध्ये एन एस एस विभागाने आयोजित केलेल्या “रक्तदान शिबीराचे” रवींद्र माने यांनी उद्घाटन केले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केले. डॉ. रवी अग्रवाल व डॉ. दर्शनी चिंचोलकर यांचे यासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button