महाराष्ट्र
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश
पनवेल : राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालय खारघर (पनवेल) येथे अनेकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ना उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आ.भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, रुपेश पाटील, प्रथमेश सोमण, रुपेश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.