महाराष्ट्रलोकल न्यूज

लांजातील दरडप्रवणग्रस्त २० घरे २५ कुटुंबांच्या स्थलांतराच्या हालचाली

लांजा :  लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण शेत्रातील इंदवटी बाईतवाडी येथील 20 घरांचे  25 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातील 6 कुटुंबे स्वत: हून स्थलांतरित  होण्यासाठी प्रस्तावित जागेचा अहवाल देण्याचे सूचना लांजा तहसीलदार यांनी भूवैज्ञानिक यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 14 जून रोजी इडवटी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील 180 कुटुंबाना सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटीसा लांजा महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वनगुळे बौध्दवाडी येथे भूस्खलनचा धोका असल्याने येथील कुटूंब अतिवृष्टी वेळी समाज मंदिरात रात्रीच्या वेळी स्थलांतर होतात दरड ग्रस्त ठिकाणी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखिम कुटुंबातील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे लांजा.  तालुक्यात अतिवृष्टमुळे किरकोळ नुकसान वगळता मोठी हानी नाही. तालुक्यातील दरड ग्रस्त गावांचे भुगर्भ शास्त्रज्ञ तर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत अतिवृष्टी जोखीम भागात खोरणींनको साईनगर मुसळेवाडी येथील 25 घरे, वनगुळे 5 घरे, इंदवटी 9, खावडी भोवड वाडी 15, गोळवशी तेली वाडी 20, साटवली तालये वाडी, भांडार वाडी 34,भांबेड दत्त मंदिर 1,वेरवली पाथरे वाडी 11, कुरंग 13,निवसर मुस्लिम वाडी 40,इदवंटी बाईत वाडी 2,गांगरकर कोकण रेल्वे  बोगद्या शेजारी 5, कोल्हे वाडी 1  या ठिकाणी या कुटुंबाना सतर्कता आदेश देण्यात आले आहेत.

इंदवटी बाईत वाडी येथील कुटुंब दुसऱ्या घरात स्थलांतर होतात. इंडवटी येथे रस्ता काम करण्यात आले आहे तर खोरणींनको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे दरडग्रस्त गावात पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आदीची या ठिकाणी या अधिकारी यांनी गावातील यंत्रणा ,संस्था मंडळे यांच्या संपर्कात राहून यांच्या मदतीने आपत्ती कालीन वेळी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लांजा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे लांजा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तहसीलदार श्री प्रमोद कदम यांनी शासकीय यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत

admin

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button