महाराष्ट्र

लांजात महामार्गाला मोठमोठे खड्डे ; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

१ मे रोजी उपोषणाला बसण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन निवेदन

लांजा:- लांजा शहरातील मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांना कंटाळून शहरवासीयांनी उग्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान या आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 1 मे रोजी आमरण उपोषणचे निवेदन जिल्हाधिकारी आणि लांजा तहसीलदार यांना दिले आहे.

लांजा शहरात दुतर्फा महामार्गावर मोठं मोठे खड्डे पडलं आहेत त्यामुळे या ठिकाणी काही अपघात झाले आहेत. आठवडा बाजार वेळी या ठिकाणी वाहन चालवणे मोठी कसरत असते गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचे मोठे साम्राज्य आहे महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकाम खाते या दुरवस्थेकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे. दोन वर्षांपूर्वी यासाठी एक आंदोलन झाले होते त्यावेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती काही लाखो रुपयांची निविदा काढण्यात आली मात्र फायदा कुणाचा झाला हे लपून न राहता शहरवासीयांना पुन्हा खड्ड्याचा सामना करावा लागत आहे होत असलेले अपघात आणि त्रास यामुळे सहनशीलता संपलेल्या नागरिकांनि आता रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे यासाठी एक बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

मध्यतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली होती डिसेंबर पर्यत निवळी ते वाकेड रखडले ले महामार्गाचे काम वेगाने करण्याचे आश्वासन दिले आहे लांजा तीळ उड्डाण पुलाचे गेली तीन वर्षांपासून काम ठप्प आहे आठ पिलर फक्त उभे केलेले आहेत त्या पिलर चे बांधकाम ही हळूहळू ढासळत जात आहे नवीन ठेकेदार नेमण्याचे आदेश दिले आहेत अजूनही उड्डाण पुलाच्या कामाला गती नाही आहे लोकप्रतिनिधी यावर आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे मात्र उदासीनता दिसून येत असल्याचे चित्र आहे आठवडा बाजारासाठी आलेल्या एका महिला नागरिकांनि लोकप्रतिनिधी च्या आडमुठ्या धोरणावर टिप्पणी केली आहे दीपक सावंत, नितीन शेट्ये ,संतोष पडीलकर, राजा लिंगायत यांनी शहरातील रस्ता दुरवस्था बाबत जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button