वशेणी, पुनाडेसह कडापे गावांच्या नवीन नामफलकांचा अनावरण सोहळा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या – गावं उदध्वस्त केली जात आहेत.आणि हे सर्व पाहता माझा गाव माझा अभिमान ! ही संकल्पना उराशी बाळगत आजपर्यंत उरण पनवेल तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून उरण तालुक्यातील वशेणी, पुनाडे, कडापे या तीन गावांना त्यांच्या गावांच्या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक बनऊन देण्यात आले त्या नूतन नामफळकाच्या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन वशेणी, पुनाडे आणि कडापे या गावांत करण्यात आले.
आतापर्यंत उरण तालुक्यात वेश्वी,वेश्वीवाडी, आवरे, सारडे, भोम, टाकी गावं या गावांच्या नावांच्या नामफलकांचे लोकार्पण झाले आहे आणि इतर अनेक गावांच्या नावांचे बोधचिन्ह नामफलक तयार बनवून अनावरण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत आज पर्यंत राजू मुंबईकर यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे आणि ह्याच सामजिक संस्कारांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या औदार्यातून आज हे सुंदर कार्य साकारलं गेलं ! पुनाडे गावचे हेमंत ठाकूर,वशेणी गावचे देविदास पाटील आणि कडापे गावचे गणेश म्हात्रे या युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देतं या तिन्ही गावांच्या विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून देण्याचं प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोप्रोली गावच्या युवा कवियात्री हेमालीताई म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे यांनी केले.केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने साकारलेल्या पुनाडे, वशेणी, कडापे या गावांत नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली ती रायगड भूषण आणि आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष भारतदादा भोपी,आदर्श शिक्षक श्रीमंत कौशिकजी ठाकूर सर, हेमालीताई म्हात्रे,अनिल घरत ( उरण तालुका सचिव - आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था ),विलास ठाकूर,(कॉन सल्लागार),सारडे गावचे सरपंच रोशनजी पाटील ,अमितजी म्हात्रे (ग्रा. पं.सदस्य सारडे ),संपेश पाटील(अध्यक्ष - मित्र परिवार ),रोशन पती (उपाध्यक्ष - मित्र परिवार ),नवनीत पाटील ( अध्यक्षा - गोल्डन ज्युबली मित्र मंडळ),हिराचंद म्हात्रे(उपाध्यक्ष गोल्डन ज्युबली
), संजिव माळी (खजिनदार
), जितेंद्र म्हात्रे (सल्लागार ), वशेणी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि राजे शिवाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास पाटील वशेणी गावच्या सरपंच अनामिकाताई म्हात्रे,उपसरपंच जयंत म्हात्रे, संग्राम पाटील (ग्रा. पं. सदस्य),संदेश गावंड (ग्रा.पं.सदस्य), विशाल पाटील (माजी उरण तालुका अध्यक्ष - आगरी, कोळी,कराडी संस्था) बीजे. म्हात्रे, रत्नाकर गावंड(मा.सरपंच ),महेंद्र पाटील ( राधाकृष्ण पालखी कमिटी अध्यक्ष ),नाशिकेत पाटील,सुरेंद्र पाटील,प्रवीण पाटील, रामलाल पाटील, दीपक पाटील, हर्षद पाटील,प्रकाश पाटील, चैतन्य म्हात्रे पुनाडे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठाकूर, पुनाडे गावचे सरपंच निलेश कातकरी,
उषाताई तांडेल(उपसरपंच), सूर्यकांत डाकी (पोलिस पाटील ),कडापे गावचे उपसरपंच चेतन म्हात्रे, प्रशांत म्हात्रे,संतोष म्हात्रे,परेश म्हात्रे,विनायक म्हात्रे,जितेंद्र थळी आणि पुनाडे, वशेणी, कडापे या गावांतील ग्रामास्थ सोबताच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलक अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला.