शिवसेना संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड
देवरूख (सुरेश सप्रे) : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख (शिंदे गट) प्रमोद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत २७ वर्षे तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रमोद पवार यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून मोठे बंड केले होते.
त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून मोठे पद देवून गौरविण्यात आले आहे.
त्याच्या निवडीने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पदाचा वापर जनसामान्यांची अनेक कामे मार्गी लावत शिवसेनेचा झेंडा अटकेपार नेत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत देवरूख पंचायत समिती व नगर पंचायतीवर पुन्हा भाजप- सेना युतीचा भगवा फडकविणेचा निर्धार प्रमोद पवार यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल त्याचे माजी आम. सदानंद चव्हाण, माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, आंबवचे उपसरपंच बाळा माने, प्रसाद सावंत यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले..