शिष्यवृत्ती परीक्षेत पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा अभिजीत तुराई राज्यात पंधरावा
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी(CBSE) मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या अभिजीत तानाजी तुराई याने महाराष्ट्र राज्यात पंधरावा क्रमांक मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा परीक्षेमध्ये कुमारी सानवी मरेवार, कुमार आरुष चव्हाण, कुमार अद्वैत नारकर व कुमार वेद नागरे यांची दुसऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या राऊंडसाठी निवड झालेली आहे.
पी एस बने इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रीयन शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आमदार सुभाष बने महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक रोहन बने,पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रदिश कलंगडण, सुपरवायझर सोमनाथ कुंभार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.