महाराष्ट्र

श्री श्री रविशंकरजी यांच्या सानिध्यात कोल्हापूरमध्ये ३१ पासून ‘महासत्संगासह महालक्ष्मी होम’

कोल्हापूर : जागतिक अध्यात्मिक गुरु आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे, गुरुदेव दि.३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोल्हापूर शहरात येणार आहेत.

गुरुदेव १२ वर्षांनंतर शहरात येत आहेत. तणावमुक्त आणि आनंदी समाज निर्माण करण्याचा त्यांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महासत्संग, संगीत, ज्ञानचर्चा आणि ध्यान होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता वैदिक पंडितांकडून महालक्ष्मी होम केला जाईल. हे दोन्ही कार्यक्रम गुरुदेवांच्या सानिध्यात होणार आहेत. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. हे कार्यक्रम तपोवन मैदान, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास तीन लाख पेक्षा जास्त नागरिक सहभागी होतील. महालक्ष्मी होमानंतर गुरुदेव १ फेब्रुवारीला करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत.

गुरुदेव म्हणतात की, “ध्यान, गायन आणि वैदिक मंत्रोच्चार मनाला स्थैर्य आणि शांती देतात, ज्याने आनंद अनुभवण्यास मदत होते.”
“कोणत्याही परिस्थितीत ध्यान केल्याने आपली ऊर्जा उच्च स्तरावर पोहोचते, राहते. जेंव्हा ऊर्जा उच्च असते तेंव्हा मन सकारात्मक बनते, राहते आणि व्यक्ती शारीरिक आजारांपासून लवकर मुक्त होण्यास मदत होते.” गुरुदेव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते नांदेड, वाटूर, तुळजापूर आणि पुणे येथे जाणार आहेत. वाटूर येथे ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांना भेट देणार आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे हजारो स्वयंसेवक हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सेवामग्न आहेत. ‘भक्ती कि लहर’ या प्रकल्पांतर्गत गेला महिनाभर महाराष्ट्रभर, सर्वत्र गावोगावी गुरुपूजा, सत्संग, ध्यान यांचे आयोजन केले होते, ज्याचा लाभ लाखो नागरिकांना झाला आहे. या अंतर्गत व्यसनमुक्ती प्रबोधन, रक्त दान शिबिरे, मोफत आरोग्य आणि दंत तपासणी आणि उपचार इत्यादी समाजोपयोगी प्रकल्प राबवले गेले. आर्ट ऑफ लिव्हिंगने लोकांचे हित लक्षात ठेवून महाराष्ट्रातील ३३ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे.

त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पुनरुज्जीवन होत असलेल्या नद्यांची संख्या – ३३, वाढलेली पाणी क्षमता – २३३६ कोटी लिटर, महाराष्ट्रातील स्वच्छ केलेले जलकुंभ – १००+, इतके काम आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button