महाराष्ट्र
संगमेश्वरचे पत्रकार संदेश सप्रे यांचे अकाली निधन
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी व तडफदार पत्रकार व दै. सकाळचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी व संगमेश्वर न्युज चे संपादक संदेश ( मन्या ) सुरेश सप्रे यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी बुधवारी दुःखद निधन झाले.
संदेश सप्रे हे पुण्यातून नियमित तपासणी आटपून पनवेल येथे आले होते. बुधवारी सकाळी ९ चे सुमारास अचानक डोके दुखत असलेने त्यांना त्वरीत पनवेल येथिल अष्टविनायक हाँस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्यांचे ब्रेन हँमरेज (मेंदूत प्रचंड रक्तस्राव) झालेने दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
यांचे पश्चात आई. पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.. त्याच्या अचानक जाणाने संगमेश्वर तालुक्यासह पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.