संगमेश्वर तालुका पदवीधर शिक्षक संघटनाध्यक्षपदी सुनील करंबेळे

देवरुख : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ व पदवीधर, प्राथमिक शिक्षक संघटना याच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हातीवचे शिक्षक सुनील करंबेळे यांची पदवीधर शिक्षक संघटना तालुका अध्यक्षपदी तर लक्ष्मण काळे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यापूर्वी संघटनेच्या विविध पदावर तरंबेळे यांनी संघटक म्हणून उत्तम प्रकारे काम पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या उपयोग होईल व संघटनात्मक अनुभवाचा संघटनेला चांगल्या फायदा होईल, असे मत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांनी व्यक्त केले.
नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्षयांचे निवडीबद्दल त्यांचे सरचिटणीस दीपक माळी, जिल्हा नेते उदय शिंदे, शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष संजय डोगे, माजी कार्याध्यक्ष अशोक भालेकर रत्नागिरी शाखेचे केशव सावंत, प्रतिनिधी मनाली कनवजे, विलेशा भोसले यांनी अभिनंदन केले.