महाराष्ट्र
साई रिसॉर्ट प्रकरणी ‘ईडी’कडून सदानंद कदमना १५ मार्चपर्यंत कोठडी
शुक्रवारी दीर्घ चौकशीनंतर झाली होती अटक
दापोली : साई रिसॉर्ट प्रकरणी तक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय व व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. या प्रकरणात ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.