महाराष्ट्र
सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील यांचा द्रोणागिरी पुरस्काराने सन्मान
उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) : पागोटे गावचे सुपुत्र, उरण तालुक्यातील जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक चंद्रकांत पाटील यांना सामाजिक क्षेत्रात निःस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल द्रोणागीरी भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्याहस्ते हा सन्मान देण्यात आला. विवेक पाटील यांनी आजपर्यंत जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविली. गोरगरिबांना मदत केली. सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व असल्याने विवेक पाटील यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.