महाराष्ट्र

हातिस उरूसानिमित्त मोफत दुचाकी दुरूस्ती व पंक्चर सेवा!

रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनतर्फे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा “पीर बाबर शेख” उरूस (यात्रा) हातिस, या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मोफत टू व्हीलर दुरुस्ती व पंक्चर सेवा पुरवली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हयातील प्रसिद्ध यात्रा “पीर बाबर शेख” उरूस (यात्रा) हातिस, या यात्रेनिमित्त भाविक दुचाकी घेऊन मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. काहीजण मित्रांसोबत तर काही भक्त आपल्या कुटुंबांसोबत दुचाकी वरून येतात. दुचाकी (टू-व्हिलर) वरून येत असताना रात्रीच्या वेळी दुचाकी नादुरूस्त झाल्यास अथवा पंक्चर झाल्यास भाविकांच्या डोळ्यासमोर मोठे संकट उभे रहाते. अशा रात्रीच्या वेळी शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी भाविकांची गाडी कोण दुरुस्त करणार? ही आर्त हाक भक्तांच्या मुखातून आम्हाला मिळाली आणि तेव्हापासून म्हणजेच “२००६” साला पासून आम्ही प्रत्येक यात्रेला “रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन” च्या वतीने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांची मोफत दुरूस्ती व पंक्चर सेवा कॅम्प करण्याचा उपक्रम राबवत असल्याचे असोसिएशन कडून सांगण्यात आले.


या मध्ये ४५/५० मेकॅनिक ची टीम संपूर्ण मार्गावर से वे करिता तयार असते. सोबत देवस्थानाला दर्गाच्या पाठीमागे पार्किंगसाठी सहकार्य करते.

पीर बाबरशेख बाबाचा दुचाकी स्वार भक्त आपल्या घरी सुखाने जावा, हा आमच्या असोसिएशनचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. या यात्रेला रत्नागिरी जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणा व पीर बाबर शेख ग्रामविकास मंडळ, यात्रा यशस्वी होण्यासाठी व सुरळीत पारपडण्यासाठी झटत असते. या मध्ये आमच्या असोसिएशनचा हा खारीचा वाटा.

रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन.

ही सेवा रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ दुपारपासून सोमवार ६ फेब्रुवारी २०२३ सकाळ पर्यंत असणार आहे.
भाविकांच्या दुचाकी गाडीला काही बिघाड झाल्यास अथवा गाडी पंक्चर झाल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१) धनंजय कदम:-९२२६५९७४७८
२) :-दिलीप शिंदे:-७३५०४५७०४०
३) समीर शेटे:-८१४९२६१०८५
४) गणेश शेंडे:-९३२५५०१९४९
५) महेश पालकर:-९४०४७६३५११
६) निखिल पुनसकर:-९८३४८८४७१५
७) अल्लाउद्दीन मेस्त्री :-७६६६७८४०८३
८) भावेश माचिवले :- ८४२५९७३७५६
९) मयुरेश यादव :-९६६५१४८८४१
१०) प्रमोद शिवलकर:-९८६००२६५९९
११) जितेंद्र भुते :- ९८२२१६१८७५
१२)अरबाज जमादार :- ९२८४८०८९३१

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button