महाराष्ट्र

हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ मालकांना कमर्शियल वीजदराच्या ओझ्यातून मुक्तता मिळण्याची आशा!


मिहीर महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

मुंबई : दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या तालुक्यात हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे चालक यांची संख्या लक्षणीय आहे.
सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरक मोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली तसेच हा विषय MSEB कडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट देखील घेतली.

आमदार ऊमा खापरे आणि मिहीर महाजन यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान मा.उपमुख्यमंत्र्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे संकेत दिले.


यामुळे हॉटेल व्यावसायिकांना इंडस्ट्रीच्या दराने वीजपुरवठा झाल्यास, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळणार असल्याची मिहीर महाजन यांनी आशा व्यक्त केली आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button