ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशिक्षण
‘एमपीएससी’मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल जाहीर
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत द्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांचा निकाल आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या वरील विभागातील सेवेसाठी मुलाखती दिलेल्या उमेदवारांचे या तारखे कडे लक्ष लागले होते. या मुलाखतींचा निकाल एमपीएससी कडून जाहीर करण्यात आला आहे.