पल्लवी परदेशी राष्ट्र निर्माता पुरस्काराने सन्मानित

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा समाजातील राष्ट्र निर्मिती करता करण्यात येणाऱ्या कामाच्या व सेवेच्या आधारावर नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात येत असतो. या वर्षाचा नेशन बिल्डर अवॉर्ड उरण तालुक्यातील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सी बर्ड स्टेशन मुलांची शाळा उरण या शाळेतील मुख्य शिक्षिका पल्लवी संतोष परदेशी यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन २००९ पासून या शाळेमध्ये विशेष शिक्षिका म्हणून काम करत आहेत. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून बीए बीएड स्पेशल एमआर, डीसीएसी एमआर, शिक्षण असलेल्या श्रीम. पल्लवी यांना उत्कृष्ट नेतृत्व, नवोन्मेष आणि सामाजिक प्रगतीसाठी समर्पणाद्वारे राष्ट्र उभारणीत समाजासाठी काहीतरी विशेष असं करण्याची धडपड आवड त्यांना होतीच म्हणून त्यांनी विशेष शिक्षण पूर्ण करून नोकरी स्वीकारली. मुलांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य आणि मुलांना आत्मनिर्भर करणे हा त्यांच्या कामातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांना त्यांच्या कामानिमित्त कर्तुत्वान महिला, उरण भूषण, आदर्श शिक्षिका इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आहे आहे. त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करत असताना पुन्हा एकदा त्यांच्यावर समाजाने राष्ट्र निर्मितीची पुन्हा त्यांना संधी दिली आहे.
हा पुरस्कार दिनेश मेहता – डिस्टिक गव्हर्नर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई सीबीडी बेलापूर यांच्याहस्ते १९ जानेवारी २०२५ रोजी बेलापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला.