यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : पनवेल तालुक्यातील शेलघर येथील ‘यमुना सामाजिकही शैक्षणिक संस्थे’तर्फे कर्जत खांडस येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर आणि सुंदर छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी पहिली ते दहावीचे सुमारे २०० विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. त्यांना नाश्ता देण्यात आला. हा कार्यक्रम भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या ‘वक्रतुंड रिसॉर्ट’मध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “आईच्या नावाने सुरू केलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक लोकोपयोगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात रुग्णवाहिका, काॅम्प्युटर वाटप, अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी कर्जत खांडस येथील ग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामागे गरिबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे हीच, माझी प्रामाणिक भूमिका आहे. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शैक्षणिक सहल आयोजित केली जाईल.”
नवीन दफ्तर आणि छत्री पाहून विद्यार्थी आपल्या विश्वात हरकून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मयुरेश चौधरी आणि महेंद्रशेठ घरत यांना आनंद झाला.
यावेळी आंबेरपाडा येथील ग्रामपंचायत सरपंच सचिन लोखंडे, यशवंत ढोंगे, वैभव पाटील, किरीट पाटील आणि एम. जी. ग्रुप टिम उपस्थित होती.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!