महाराष्ट्र
रत्नागिरीत २४ रोजी अ. भा. मराठा महासंघाचा पदनियुक्ती समारंभ
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठा महासंघाचा युवक युवती पदनियुक्ती समारंभ शनिवार दि. २४ जून खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १:०० वाजता हा समारंभ होणार आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश युवक अध्यक्ष रणजीत दादा जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त युवक युवती पदाधिकाऱ्यांना पदनियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार दिली जाणार आहेत. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश संघटक करणसिंह मोहिते हंबीरराव मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अंकिता दीपक राजेशिर्के यांनी केले आहे.