रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उरण येथे मोटारसायकल हेल्मेट रॅली
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रस्ता सुरक्षा सप्ताहचे औचित्य साधून रस्ते अपघात विषयी जनजागृती करण्यासाठी उरण मध्ये मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेलचे अभय देशपांडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे,सचिन विधाते, नीलेश धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक दिनेश बागुल, संजय पाटील तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत मोटार सायकल हेल्मेट रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित मोटार वाहन धारकांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सामाहिक प्रतीज्ञा घेण्यात आली.
यावेळी श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूलचे बळीराम ठाकुर,उरण मोटार ट्रेनिंग स्कूलचे दानिश मुकरी,हरि हरेश्र्वर मोटार ट्रेनिंग स्कूलचे जितेंद्र प्रधान, गणेश मोटार ट्रेनिंग स्कूलचे गणेश भोईर,श्रीराघोबा मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रितम पाटील यांनी उरण केअर पाॅईंट हाॅस्पिटल ते एनएनएमटी स्टाॅप, उरण असे मोटार सायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाहन चालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. सदरचे रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात मोटार सायकल स्वारांनी प्रतिसाद देऊन रॅली यशस्वी केली.