जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रभानवल्ली प्रशालेचा शार्दुल गांधी प्रथम

लांजा : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्पर्धेमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात १७ वर्ष वयोगटामध्ये आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली या प्रशालेच्या शार्दुल विवेक गांधी इयत्ता दहावी याने ३८ मीटर इतका भाला टाकून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या आधी लांजा तालुकास्तरीय स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटांमध्ये शार्दुल याने 41.5 मीटर इतकी भालाफेक करून लांजा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. लांजा येथील महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी लांजा तालुकास्तरावरील स्पर्धा झाली होती. या स्पर्धेमधूनच शार्दुल याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी डेरवण झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील शार्दुल विवेक गांधी याने आपल्या प्रथम क्रमांक टिकवून ठेवला.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील भालाफेक प्रकारातील आपले वर्चस्व कायम ठेवल्याबद्दल शार्दुल याचे श्रीदेवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळ प्रभानवल्ली खोरनिमको यांच्यातर्फे शार्दुलचे अभिनंदन करण्यात आले. शार्दूलच्या या यशाबद्दल मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. जितेंद्र ब्रीद यांनी शार्दुलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.