सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था, कळंबुसरेतर्फे अनाथ मुलांना मोफत वह्या पुस्तके वाटप
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : समाजातील अनाथ, गोर-गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर समीर शंकर म्हात्रे, कळंबुसरे यांनी स्थापन केलेल्या सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था, कळंबुसरे या संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले एक स्तुत्य उपक्रम म्हणजे “अनाथ मुलांना मोफत वह्या पुस्तके वाटप अभियान” या उपक्रमाअंतर्गत कौस्तुभ संतोष पाटील (मोठीजुई), वेदांती रविंद्र पवार (टाऊनशिप), उन्मेक्षा मनोज ठाकूर (वशेणी), नितिक मनोज ठाकूर (वशेणी), भाविका वासुदेव पाटील (दादर, पेण), भावेश वासुदेव पाटील (दादर, पेण), भुमिका चव्हाण (बालई, उरण), श्रेयस चव्हाण (बालई, उरण), आस्था जैन (उरण), पालक जैन (उरण), निदिता करवडकर (मोरा, उरण), हरदिप करवडकर (मोरा, उरण), मनिषा सुरेश कोरेकर (गणेश नगर, उरण) अशा १ ली ते पदवी पर्यंतच्या अनेक मुलांना मोफत वह्या-पुस्तके वाटप करण्यात आली.
या स्तुत्य अशा उपक्रमासाठी संस्थेचे सल्लागार विठ्ठल ममताबादे, कार्याध्यक्ष पद्माकर पाटील, सदस्या ऍड.रेश्मा धुळे, संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.