महाराष्ट्र
हज बोर्डच्या सदस्यपदी मोहम्मद शकील काझी
मुंबई, २५ जानेवारी : हज बोर्डच्या सदस्यपदी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद शकील काझी यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात श्री. काझी यांचे बुधवारी अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, राजस्थान प्रकोष्ठ संयोजक सुरेश शहा, मुंबई प्रवक्ते निरंजन शेट्टी, प्रदेश कार्यालय सचिव मुंकुद कुलकर्णी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.